12.4 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

- Advertisement -

विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

- Advertisement -

नाथ्रा येथे सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवंराच्या हस्ते होणार वितरण

- Advertisement -

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत. यावेळी सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
नाथ्रा येथे दि. 4 जानेवारी 2023 रोजी 6 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा ता.परळी वैजनाथ आयोजित करण्यात आला आहे. या संम्मेलनाचे उद्घाटक आ.धनंजय मुंडे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा पालक मंत्री बीड, महाराष्ट्र राज्य, अध्यक्षस्थानी नम्रता चाटे उपजिल्हाधिकारी, परळी वैजनाथ, प्रमुख उपस्थिती डॉ. स्वप्नील चौधरी दंगलकार, युवा कवी साहित्यक, पुणे प्रमुख उपस्थितीत दगडु लोमटे सदस्य, म.सा.प. मराठवाडा, अमर हबीब जेष्ठ साहित्यीक, अंबाजोगाई व स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. एकनाथ मुंडे
अध्यक्ष, श्रीनाथ मानव सेवा मंडळ तर कार्याध्यक्ष डॉ. संतोष ए. मुंडे (कान, नाक व घसा तज्ञ) श्रीनाथ हॉस्पिटल आदी उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनातं कविता,भारुड, कथा वाचन, ग्रंथदिंडी व पुरस्कार वितरण आदि कार्यक्रम संपन्न होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.एकनाथ मुंडे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. उत्कृष्ट नियोजन नुसार कार्यक्रम संपन्न होत आहे. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या साहित्य संमेलनात सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विश्वजीत मुंडे यांनी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार म्हणून सर्व सामान्य विद्यार्थ्यांंना महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश येथे एम.बी.बी.एस.,बी.ए.एम.एस., बी. डि.एस., बी.एच.एम.एस.तसेच वैद्यकीय पदव्युत्तर एम.डी.,एम.डी.एस., एम.एस.या अभ्यासक्रमासाठी अनेक शासकीय व खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला आहे. यामुळे विश्वजीत मुंडे यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.त्यांचा कार्याचा मान्यवरांच्या हस्ते उचित गौरव होणार आहे. या उतुंग यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles