पोलीस कर्मचाऱ्याचे कुकर्म लग्नाचं आमिष देत,धमकी देत शारीरिक संबंध

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

यूपीच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने पोलीस कर्मचाऱ्यावर आमिष दाखवून 50 वेळा शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आरोपी कानपूरच्या देहात पोलीस लाइनमध्ये तैनात आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

लखनौच्या एका भागात राहणाऱ्या तरूणीने कृष्णा नगर पोलीस स्टेशनमध्य याबाबत तक्रार दिली. तिने सांगितलं की, ती प्रतिष्ठानमध्ये नोकरी करते. यादरम्यान तिची भेट शिफाई सुनील कुमार सिंहसोबत झाली. तो प्रयागराजचा राहणारा आहे आणि कानपूर देहातमध्ये तैनात आहे.

तरूणीने सांगितलं की, सुनील म्हणाला होता की, तो अविवाहित आहे. यानंतर त्यांचं फोनवर चॅटींग सुरू झालं आणि नंतर तो तिच्या रूमवरही येऊ लागला होता. यादरम्यान त्याने तरूणीला लग्नासाठी विचारलं. त्याच्या बोलण्यात येऊन तरूणी सुद्धा तयार झाली. त्याने तो नेहमीच रूमवर येत होता आणि रात्री मुक्काम करत होता. मग वेगवेगळे आमिष दाखवून त्याने जबरदस्ती तिच्यासोबत संबंध ठेवले. जर शारीरिक संबंध ठेवू दिले नाही तर तो लग्नाचं आमिष देत होता आणि धमकीही देत होता.

पुढे ती म्हणाली की, सुनीलने माझ्या रूमवर येऊन माझ्यासोबत 50 पेक्षा अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवले. सुनील तिला गप्प ठेवण्यासाठी पैसेही देत होता. हे बरेच दिवस सुरू राहिलं. इतकंच काय तर त्याने त्याच्या घरातील लोकांसोबतही तिचं बोलणं करून दिलं होतं. त्याचा मोठा भाऊ अजय सिंह गुजरातमध्ये नोकरी करतो. पण तिचा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा तिने सुनीलला लग्नासाठी पुन्हा विचारलं आणि त्याने नकार दिला.

पीडितेने सांगितलं की, ती सुनीलच्या कुटुंबियांसोबत बोलली. पण सगळ्यांनी तिला नकार दिला. सोबतच सुनील धमकी देत म्हणाला की, तो पोलिसात आहे. त्याचं कुणी काही करू शकत नाही. त्यानंतर तरूणीने पोलिसात गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here