व्हिडीओ तुफान व्हायरल प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकराने तिला रस्त्यात केली बेदम मारहाण

मध्यप्रदेश : मध्यप्रदेश राज्यातील रीवा जिल्ह्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये एक मुलगा मुलीला जोरदार मारहाण करीत असल्याचं दिसतं आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी त्याची प्रेयसी आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकराने तिला रस्त्यात बेदम मारहाण केली आहे. ज्यावेळी प्रियकर तरुणीला मारहाण करीत होता. त्यावेळी तिथं उभ्या असलेल्या प्रियकराच्या मित्राने ती घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे.

ज्यावेळी दोघांच्यामध्ये कायतरी बोलणं सुरु होतं. त्यावेळी तरुणी जागेवर थांबते. त्यानंतर तरुण हातात असलेलं साहित्य एका बाजूला ठेवून तिला मारहाण करायला सुरुवात करतो. तो इतक्या जोरात तिला मारहाण करतो की, ती काही वेळानंतर जमिनीवर कोसळते. त्यानंतरही तो तिला मारहाण करीत राहतो. विशेष म्हणजे ज्यावेळी प्रियकर प्रेयसीला मारहाण करीत होता. त्यावेळी प्रियकराने मित्राला व्हिडीओे तयार करु नको असं सांगितलं होतं. परंतु मित्राने व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.

प्रेयसीच्या घरचे लग्नासाठी तयार नसल्यामुळे प्रेयसीने प्रियकराला लग्नासाठी नकार दिला होता. त्याचबरोबर व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
प्रियकराने जोरदार मारहाण केल्यानंतर प्रेयसी कित्येक तास रस्त्याच्या कडेला पडून त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं आहे. मऊगंज स्थित ढेरा गावातलं हे प्रकरण आहे. मुलीच्या आईने याबाबत कसल्याही प्रकारची तक्रार करण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी व्हिडीओ पाहून तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here