सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्याने एका नेत्याला भररस्त्यात चप्पलने केली मारहाण व्हिडिओ पहा..

मध्यप्रदेशातील (MP) एक स्थानिक नेत्यांचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सरपंच (Sarpanch) आणि त्यांच्या कार्यकर्त्याने एका नेत्याला भररस्त्यात चप्पलने मारहाण केली आहे.

हा संबंधित व्हिडीओ सोमवार दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या नेत्याला रस्त्यात मारहाण झाली आहे, तो सिंधिया फॅन क्लबचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगितलं जात आहे.

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील सिरोंज भागात शनिवारी एका नेत्याला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. देवेंद्र शर्मा यांना मारहाण झाल्याची सगळीकडे चर्चा आहे. संरपंचांनी सांगितलं की, शर्मा यांनी विकास कामांसाठी पैसे घेतले होते.

पैसे घेतल्यापासून काम काहीचं सुरु झालेलं नाही. तसेच पैसे पुन्हा मागितल्यानंतर सुद्धा शर्मा यांनी उलट उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर चिडलेल्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शर्माला चप्पलने मारहाण केली.
शर्मा यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा फोटो लावून पैसे उकळले आहेत असा देखील आरोप झाला आहे. मध्यप्रदेशात हा व्हिडीओ इतका व्हायरला झाला आहे. पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here