बीड मतदार दक्षिण आफ्रिकेत त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु बीड जिल्ह्यातून एक बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे.
हा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात घडला.

चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक २ मध्ये मतदार यादी क्रमांक १४५ शेख शकील बाबामिया असं मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या गावामध्ये उपस्थित नसताना देखील त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले आहे. या संदर्भात झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बोगसगिरी करून मतदान मिळवण्यासाठी अनेक उमेदवार युक्ती लढवत होते. दक्षिण आफ्रिकेत असलेल्या व्यक्तीचं मतदान उघडकीस आल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here