विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात

बीड : Beed News बीडमध्ये क्षीरसागर काका- पुतण्या आमने- सामने आले आहेत आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे (Maharashtra Grampanchayat Election 2022) मतदान सुरू झाले आहे. राज्यात मतदानाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील (Beed District) वडवणी तालुक्याचे (Wadavani) तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामस्थांचा तहसील कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी ठिय्या

बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडे वस्ती येथील मतदान बूथ प्रत्येक वेळी मेंगडेवाडीच येथेच असते. मात्र यावेळी प्रशासनाने अचानक तेथील बूथ चऱ्हाटा येथे हलविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी बीड तहसिलसमोर ठाण मांडले होते. मेंगडेवाडी येथेच बूथ ठेवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

News Reels

670 ग्रामपंचायतीसाठी मतदान

बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत. जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात करण्यात आले आहेत. तर, संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची अधिक कुमक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here