जेवणात बेशुद्धीचे औषध मिसळून 3 दीवस अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्युटी पार्लरमध्ये सोबत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून बेशुद्ध करुन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी एका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची, तिथे आरोपीची आई देखील काम करते.
कालीपूजेच्या रात्री त्या महिलेने मुलीला जेवायला बोलावले. यावेळी जेवणात बेशुद्धीचे काही औषध मिसळण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्पवयीन बेशुद्ध पडली. यावेळी त्या महिलेच्या मुलाने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने 16 डिसेंबर रोजी हरिदाबपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या आईला अटक केली आहे. हरिदेवपूर येथे ही खळबळजनक घटना घडली. आरोपी आईचे नाव अनुश्री कोठारी आणि मुलाचे नाव कुणाल कोठारी आहे.
16 डिसेंबर रोजी हरिदबपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 24 तारखेला काली पूजेच्या रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या पार्लरमधील सहकाऱ्याच्या घरी गेली होती. तिथे तिला खायला दिल्याचा आरोप आहे. यानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर महिलेच्या 18 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

घरच्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी हरिदेवपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 120B गुन्हेगारी कट, 328 अन्नात भेसळ, POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या आईलाही अटक करण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर कोलकात्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here