बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुलगा दारूच्या आहारी गेलेला आहे. त्याच्या सततच्या त्रासामुळे पत्नी 6 महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. “तू तुझ्या आईला फोन का केलास”, असे म्हणत 10 वर्षीय पीडित मुलीला पित्याने मारहाण (beaten to daughter) केली. (Rape Case) त्यानंतर 8 डिसेंबरच्या पहाटे पित्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

बीड : बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बीडमधून उघडकीस आली आहे. एका दारुड्या पित्याने पोटच्या 10 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तर यावेळी आजी-आजोबांमुळे चिमुकली नराधम पित्याच्या तावडीतून वाचल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आजीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापास बेड्या ठोकल्या
७० वर्षीय वृद्ध महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा दारूच्या आहारी गेलेला आहे. त्याच्या सततच्या त्रासामुळे पत्नी ६ महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली आहे. आरोपीला दोन मुली आहेत. त्यांचा सांभाळ आजी-आजोबा करतात.

गेल्या ७ डिसेंबरला “तू तुझ्या आईला फोन का केलास”, असे म्हणत १० वर्षीय पीडित मुलीला पित्याने मारहाण (Crime News) केली. त्यानंतर ८ डिसेंबरच्या पहाटे पित्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वेळीच आजी-आजोबांनी नातीला आरोपी बापाच्या तावडीतून सोडले अन तिला घेऊन रिक्षाने नातेवाईकाचे घर गाठले.
दरम्यान, याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here