बीड वाढदिवसानिमित्त बड्डे बॉयला चक्क ‘रेडा’ गिफ्ट

भाजप शहराध्यक्षाच्या भावाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला गेला. मात्र त्याला दिलेलं आगळं वेगळं गिफ्ट पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी केली होती. गिफ्ट पाहून संपूर्ण महाराष्ट्रात होतेय चर्चा

बीड : बीड मध्ये एका वाढदिवसाची चर्चा जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढदिवसानिमित्त बड्डे बॉयला चक्क ‘रेडा’ गिफ्ट करण्यात आला आहे. ढोल ताशांच्या गजरात मित्राला भेट म्हणून दिलेल्या रेड्याची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
बीडचे भाजपचे शहराध्यक्ष व एका वॉर्डचे नगरसेवक असलेले जगदीश गुरखुदे यांचे लहाने बंधु ‘परशुराम गुरखुदे’ यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र कंपनीने चक्क एक ‘रेडा’ भेट म्हणून दिला आहे. हे अनोखं गिफ्ट पाहून सगळ्यांचं घाम फुटला आहे.

यावेळी परशुराम गुरखुदे यांना सहा फूट उंच तर सात फूट लांब असा डौलदार, आकर्षक रेडा देण्यात आला आहे. आणि त्याच्या अंगावर वाघाची डिजाईन देखील करण्यात आली होती. बीडच्या माळीवेस भागात वाजत गाजत या रेड्याचे आगमन झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती.

मात्र, काही क्षणासाठी गर्दीतून पाहिल्यानंतर वाघच आला की काय असा भास नागरिकांना होऊन लागला होतो. हे अनोखं गिफ्ट पाहण्यासाठीच नागरिकांनी यावेळी तोबा गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर या वाढदिवसाची चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here