सावधान ! मानवामधील वाय गुणसूत्र हळुहळू संपुष्टात येत आहे, प्रथ्वीवर मुलांचा जन्मच होणार नाही. तर केवळ मुलींचा जन्म होईल

विज्ञानाच्या जगतात होत असलेल्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर येत असते. दरम्यान, एकेदिवशी पृथ्वीवरून पुरुषच विलुप्त होऊन केवळ महिलाच उरतील, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुरुष लुप्त झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, कशा प्रकराचा जीव जन्माला येणार, माणसाचा वंश पुढे कसा जाईल, असे प्रश्न निर्माण झाले आहे. त्याचं कारण म्हणजे पृथ्वीवर बहुतांश प्रजनन किंवा वंश पुढे नेण्याचं काम नर आणि मादी मिळून करत असतात. आता पुरुषांसह अनेक सस्तन प्राण्यांमधून वाय गुणसूत्र नष्ट होत आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मानवामधील वाय गुणसूत्र हळुहळू संपुष्टात येत आहे. त्यामुळे एक वेळ अशी येईल की, मुलांचा जन्मच होणार नाही. तर केवळ मुलींचा जन्म होईल. आता जर मुलग्यांचा जन्मच झाला नाही तर त्यांच्या जागी कशा प्रकारचा जीव येईल, कुठला नवा सेक्स जीन विकसित होणार का, हा मोठा प्रश्न आहे. हल्लीच प्रोसिडिंग ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स जर्नलमध्ये या विषयावर एक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये नर जन्माला घालणारे जिन्स संपुष्टात येत असल्यावर संशोधन करण्यात आले आहे.

वाय गुणसूत्रामध्ये सुमारे ५५ जीन असतात. त्याशिवाय अनेक नॉन कोडिंग डीएनएसुद्धा असतात. वाय गुणसूत्र आकारामध्ये एक्स पेक्षा लहान असते. मात्र त्याच्याजवर जीन कमी असले तरी गर्भामध्ये विकसित होत असलेले बाळ मुलगी असेल की मुलगा हे तोच निश्चित करतो. सर्वसाधारणपणे जेव्हा गर्भधारणेला १२ आठवडे होतात. तेव्हा मास्टर सेक्स जीन इतर जीन्सना आता तुम्ही नर टेस्टिसची निर्मिती करा अशी सूचना देतात. भ्रूणामध्ये बनणारे टेस्टिस नर हार्मोन्स तयार करतो. त्यामुळे मुलगा जन्माला येतो.

१६.६ कोटी वर्षांमध्ये वाय गुणसूत्र ९०० जीनपासून कमी होत होत ५५ वर आले आहेत. तर मानव आणि प्लेटिपस एकत्र विकसित होत होते. याचा अर्थ असा होतो की, प्रत्येक १० लाख वर्षांमध्ये माणसांमधील वाय गुणसूत्र ५ जीन गमावत आहेत. म्हणजेच पुढच्या १.१० कोटी वर्षांमध्ये माणसामधील वाय गुणसूत्र पूर्णपणे नष्ट होईल. तिथूनच पुरुषांचा जन्म होण्याचं चक्र थांबेल. मात्र पृथ्वीवर पुरुष वाचले तर त्यांच्यासाठी काही नवे जीन तयार होणार का, हा प्रश्न आहे.

वाय गुणसूत्र संपल्यामुळे पुरुष नष्ट होतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जगात काही पाली आणि सापाच्या अशा प्रजाती आहेत ज्यांच्यात केवळ मादीच आहेत. त्या स्वत:च प्रजनन करतात. वाय गुणसूत्र नष्ट झाल्यास माणसांची जात लुप्त होण्यास फार वेळ लागणार नाही. मात्र या वाय गुणसूत्राच्या जागी कुठलीही नवे गुणसूत्र विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या याबाबत काहीही सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here