भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रा वाघ संतापल्या ४२ वर्षीय महिलेवर तीन नाराधमांचा सामूहिक बलात्कार

बलात्कार करून सिगारेटचे चटके दिले, आरोपी फरार
संबंधित पीडित ४२ वर्षीय महिलेची मेडिकल चाचणी चालू असून, मुंबई पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. या नाराधामांच्या पोलिस लवकरच मुसक्या आवळतील असा विश्वास भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई उपनगरातील कुर्ला येथे ४२ वर्षीय महिलेवर तीन नाराधमांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. बलात्कार केला व नंतर त्या महिलेच्या गुप्तांगावर सिगरेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित महिला पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यास गेली तेव्हा हा घटनेची उकल झाली.

पीडित महिला ही ४२ वर्षाची असून पहाटेच्या वेळी नराधाम घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर पीडित महिलेच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके देण्यात आले. ही माहीला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेली तेव्हा पहिल्यांदा महिलेने हाताला लागल्याचे तक्रारीत सांगितले. मात्र नंतर त्या महिलेने तिच्यावर झालेली आपबीती सांगितली. अशी माहिती भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, कुर्ला पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६डी (सामूहिक बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ३२४ (खतरनाक शस्त्राने स्वेच्छेने दुखापत करणे) आणि इतर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कुर्ला पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here