8.3 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

सरकारी वाहने १५ वर्षांनंतर भंगारात काढण्यात येणार

- Advertisement -

नागपूर : देशात अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची मोठी समस्या आहे. १५ वर्षानंतर वाहने जुन्या झाल्याने प्रदुषण वाढते.
सर्व सरकारी वाहने १५ वर्षांनंतर भंगारात काढण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात ॲग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर निर्णयावर स्वाक्षरी करण्यात आली. यानुसार केवळ सरकारचीच नव्हे तर सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांमधीलदेखील वाहने भंगारात काढण्यात येतील. प्रत्येक राज्य शासनानेदेखील हाच नियम पाळावा अशी विनंती करणार आहे. भारत सरकारच्या या धोरणाला सर्व राज्य शासनांना पाठविण्यात आले आहे. स्क्रॅपिंगचे प्रत्येक जिल्ह्यात चार युनिट उघडण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles