माजी सरपंचाचे घृणास्पद कृत्य 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार

पुण्यातील (Pune Crime) एका माजी सरपंचाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष नाझिरकर (वय 40) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असे सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा (Pune Crime) तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here