लहानगा म्हशीच्या पाठीवर बसून गाणे गाताना दिसत आहे व्हिडिओ पाहून काही क्षणांसाठी का होईना आपण आपले ताण विसरतो

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. लहान मुलांच्या बाबतीतल्या तर असंख्य गोष्टी याठिकाणी दर मिनीटाला अपलोड होत असतात आणि तितक्याच वेगाने त्या व्हायरलही होतात.
लहान मुलांचा निरागसपणा आणि गोंडसपणा दाखवणारे हे व्हिडिओ पाहून काही क्षणांसाठी का होईना आपण आपले ताण विसरतो आणि या व्हिडिओजचा आनंद घेतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यामध्ये एक लहानगा म्हशीच्या पाठीवर बसून गाणे गाताना दिसत आहे. आता हा मुलगा आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र समजू शकले नाही

(Viral Video of Boy Singing Mujse Shadi Karogi Sitting on Buffalo).

प्रत्यक्षात हा मुलगा गाणे गात नसून दुसरेच कोणी गाणे म्हणत आहे. मात्र तो करत असलेले हावभाव पाहून तोच हे गाणे म्हणतोय असं वाटतं. डबिंगच्या माध्यमातून सध्या अशाप्रकारच्या गोष्टी करणे सहज शक्य असून असे काही ना काही प्रयोग केले जातात. ‘मुझसे शादी करोगी….’ हे गाणं हा लहानगा अतिशय तालासुरात म्हणतोय असं आपल्याला सुरुवातीला वाटतं पण प्रत्यक्ष दुसराच मुलगा गाणं म्हणत असल्याचं नंतर आपल्या लक्षात येतं.
ट्विटरवर हा २५ सेकंदांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कोणीतरी या मुलांचं ऐका असं शेअर करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. एका शेतात म्हशीच्या पाठीवर अगदी निवांत बसणाऱ्या या लहानग्याच्या धा़डसाचे कौतुक होताना दिसत आहे. एका दिवसांत हा व्हिडिओ जवळपास ४७ हजार जणांनी पाहिला असून त्यावर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. त्यामुळे सोशल मीडियावर लोक काय अपलोड करतील आणि व्हायरल होईल ते आपण सांगूच शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here