6.6 C
New York
Friday, March 29, 2024

Buy now

नवले पुलावर भीषण अपघात अपघातात आत्तापर्यंत 48 वाहने समाविष्ट अपघाताचे कारण काय?

- Advertisement -

पुणे : पुण्यात काल रात्री मोठी दुर्घटना घडली. नवले ब्रिज येथे भीषण अपघात झाला होता. यात एका भरधाव कंटेनरने एक-दोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
आता या नवले पुलावर झालेल्या अपघाताच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, कंटेनरचे ब्रेक फेल झालं नसल्याचं तपासात उघड झालं आहे. तर, चालकाने गाडी न्यूट्रल करून उतारावर इंजिन बंद करून गाडी चालवल्याने हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

या अपघातानंतर चालक अजूनही फरार आहे. पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकूण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली.

- Advertisement -

यात बऱ्याच वाहनांचं नुकसान झालं आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles