ताज्या बातम्या

चक्रीवादळामुळे रस्त्यावर अतिशय भीतीदायक वातावरण व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की काय झालं …


अपघात काही सांगून येत नाहीत. कधी हे अपघात लोकांच्या स्वत:च्या चुकीमुळे होतात. तर काही अपघात ते दुसऱ्यांच्या चुकीमुळे होतात. एवढंच काय तर काही अपघात हे नैसर्गिक कारणांमुळे देखील होतात
त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेतलेली केव्हा ही चांगलीच. यासंबंधीतचा एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की काय झालं हे कळणारच नाही. पण हा व्हिडीओ धोकादायक नक्कीच आहे.

https://twitter.com/OTerrifying/status/1593967331922812931?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1593967331922812931%7Ctwgr%5E469272a5ca18b8faa73879fa7721fe7946acfa66%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

कधी कधी निसर्गाचे उग्र रूपच अपघातांचे कारण बनते. या व्हिडीओमध्ये देखील तसंच घडलं. चक्रीवादळामुळे रस्त्यावर अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालं, ज्यामध्ये एक कार अडकली आणि तिचा भयंकर अपघात घडला. वादळ किंवा जोराचा पाऊस पडत असतो तेव्हा कधीही घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो.

पण तरी देखील काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण काही वेळेला असे वादळ अचानकच येतात. ज्याची लोकांना कल्पना नसते. पण असं असलं तरी देखील काही वेळेला आपला योग्य निर्णय आपले प्राण देखील वाचवू शकतो.

पण ते या कार चालकाला कळलं नाही आणि त्याने कसलाही विचार न करता आपली कार वादळाच्या प्रवाहात नेली आणि त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले. वादळात एक वाहन अडकल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हे वादळ इतकं जोराचं आहे की ते गाडीलाच घेऊन गेले. समोर वादळ असल्याचं पाहून देखील या चालकाने आपली कार तेथे नेली, ज्यामुळे त्याची कार वादळाच्या तावडीत सापडली.

ही सगळी घटना मागे असलेल्या गाडीच्या कॅमेरामध्ये कैद झाली. ज्यामुळे या कार सोबत नक्की काय घडलं हे आपण पाहू शकतो.
वादळ कारला घेऊन गेल्यावर त्यातुन एक व्यक्ती खाली पडते आणि ती त्या वादळाकडे पाहातच बसते. त्या व्यक्तीला काही सेकंदासाठी हे कळत देखील नाही की नक्की त्याच्यासोबत काय घडलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही भारावून जाल हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 14 सेकंदांचा हा व्हिडीओ लाखोवेळा पाहिला गेला आहे. लोक हा व्हिडीओ सारखा-सारखा पाहात आहेत.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *