मटणाच्या दुकानासमोरच्या भावफलका वरुण मटण कापण्याच्या कत्तीने खून


औरंगाबाद : मटणाच्या दुकानासमोर भावफलक लिहून दुसऱ्या दुकानास आड ठेवल्याने जाब विचारताच एका मटण शॉपचालकाने जाब विचारणाऱ्या दुसऱ्या शॉपचालकाचा मटण कापण्याच्या कत्तीने खून केल्याची घटना घडली आहे.
हा प्रकार २० नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान वैशाली ढाब्याजवळ मिसारवाडी, अबरारनगर परिसरात घडला.

अशपाक शहा युसूफ शहा (वय ३५, रा. मिसारवाडी, अबरारनगर, मूळ रा. मादणी, सिल्लोड) असे मृत दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शायद गुलाम कुरेशी, अब्दूल कलीम गुलाम कुरेशी, अब्दूल सलाम कुरेशी यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. मृत अशपाक शहा आणि आरोपी या दोघांचे सदर परिसरात शेजारी मटणाचे दुकान आहे.

आरोपीने भावफलकावर पाचशे रुपयांचा दर लिहिला आणि तो अशपाकच्या दुकानाच्या आड ठेवला. त्यावर अशपाकने आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने मटण कापण्याच्या कत्तीने अशपाकच्या छातीवर वार केले. यात अशपाक हा गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असता, दुपारी साडेतीन वाजेदरम्यान अशपाकला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here