धक्कादायक ! महिलेने तिच्या दोन मुलांना पाण्यात टाकून स्वत:ही जीवन संपवले

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या दोन मुलांना पाण्यात टाकून स्वत:ही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. घटना बिरकाली भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय हुसैनाने ५ वर्षांची मुलगी सिमरन आणि १८ महिन्यांचा मुलगा विशाल यांना सर्वप्रथम तलावात टाकले. नंतर संबंधित मुलांच्या आईने देखील तलावात उडी मारून जीवन संपवले.

घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रघुवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैना या महिलेचा सात वर्षांपूर्वी विकास खान नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना दोन मुलेही होती. मात्र हुसैना आणि विकास यांच्यात वारंवार वाद होत होते. घरगुती वादातून हुसैनाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here