विद्यापीठाच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आष्टीच्या फार्मसी कॉलेजचे यश

 

आष्टी : आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासूटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (बी.फार्मसी) कॉलेजमधील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कुमार अनुष्क निलेश देवरायकर याने विद्यापीठ सलग्नित अंतर महाविद्यालय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून कॉलेजचे नाव उंचावले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार 14 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या यशाबद्दल कुमार अनुष्का निलेश देवरायकर याचे संस्थेचे संस्थापक मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे संचालक डॉ. अजय (दादा )धोंडे, अभय धोंडे ,सर्व प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत , शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे , माऊली बोडखे ,संजय शेंडे यांनी व कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे क्रीडा प्राध्यापक अभिलाष वाघमारे व इतर सर्व प्राध्याकांचे अभिनंदन केले.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here