पर्यटकांनी फेकलेल्या पिशव्या जंगली प्राण्यांना खाण्याची वेळ..

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मानवाने नैसर्गिक संसाधनांवर अतिक्रमण केलं आणि निसर्गाने त्याचं फळ हळूहळू द्यायला सुरूवात केली. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, महापूर हे त्याचेच उदाहरणे. पण मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळे जंगली प्राण्यांना धोका पोहोचलाय.
जंगलात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी फेकलेल्या पिशव्या जंगली प्राण्यांना खाण्याची वेळ सध्या आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सुप्रिया साहू या महिला IAS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक हत्ती प्लास्टिकची पिशवी खात असताना दिसत आहे. ‘मानवाने जंगलात टाकलेल्या प्लास्टिक पिशव्यांची किंमत जंगली प्राण्यांना मोजावी लागते. त्यांना याचा काय त्रास होत असेल?’ असं सुप्रिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, जंगलात किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या ठिकाणी फिरायला गेल्यावर सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. प्राण्यांना आणि तेथील जीवसृष्टीला धोका पोहचेल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या एका बेजबाबदारपणामुळे मोठा धोका पोहची शकतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here