विवाहित महिलेचा प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा मानसिक छळाला कंटाळून तरुणाची झाडाला गळफास घेत आत्महत्या

पिंपरी : दोन मुली असलेल्या विवाहित महिलेने प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावला. तसेच जर लग्न केले नाही तर पोलीस केस करण्याची धमकी तरुणाला दिली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विकास विलास माळवे (वय २७) असे आहे. या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ही विवाहित असून तिला दोन मुली आहेत. मात्र, तिचे मागील तीन वर्षांपासून विकास याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने विकासकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. तसेच त्याने इतर कोणासोबत लग्न केले तर त्याच्यावर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.

आरोपी स्वत:चे घर चालविण्यासाठी पैशाची मागणी देखील करत होती. आरोपीकडून या वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास याने शेतामधील झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here