महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी व्यापाराला अटक

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर : महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या एका हार्डवेअर दुकान चालवणाऱ्या व्यापाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे.
58 वर्षीय इंद्रदेव घनसानी असे आरोपीचे नाव आहे.
जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीत सांगितल्याप्रमाणे (Nagpur News) पोलीस स्टेशन हद्दीतील पीडित महिलेला आरोपीने फोन करून आपल्या दुकानात बोलावले. महिला दुकानात पोहोचली तेव्हा या महिलेला आरोपीने काही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले. या महिलेचे आणि काही लोकांशी (Crime News) अनैतिक संबंध असल्याचा हा पुरावा असल्याचे महिलेला आरोपीने सांगितले. ऑडिओ क्लिप वायरल करून समाजात बदनामी केली जाईल असे आरोपीने महिलेला धमकावले आणि शरीर सुखाची मागणी केली.
जर ऑडिओ क्लिप वायरल करायची नसेल, तर एक लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी आरोपीने महिलाकडे केली. या संपूर्ण प्रकरणात घाबरलेल्या महिलेने आधी पोलीस स्टेशन गाठले. या संदर्भात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी घनसानी विरोधात वसुली, ब्लॅकमेलिंग करणे आणि धमकावण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात हनी ट्रॅपचा काही संबंध आहे का? काही व्यापारी आणि दुकानदार यांच्याकडे महिलांना पाठवून त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून धमकावल्याचे आणखी काही प्रकरण आहे का? या संदर्भातही पोलीस तपास करत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या ! 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here