स्नुषा जयश्री कालेलकर ठाकरे यांचं आज निधन


थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या स्नुषा जयश्री कालेलकर ठाकरे यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.
जयश्री या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यामुळे त्या मुंबईतल्या टाटा रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांना तिथून घरी आणण्यात आलं. मात्र रात्री तब्येत ठीक नसल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं.
अखेर सकाळी सात वाजता त्यांचं निधन झालं. जयदेव ठाकरे यांच्या त्या पहिल्या पत्नी होत. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी स्मिता यांच्याशी लग्न केलं. शिवसेनेतल्या बंडानंतर या दोघांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नुकतेच हे दोघेही चर्चेत आले होते.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या ! 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here