सरकार पडणार म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले..

औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.

त्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाकडून जोर धरू लागली. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) यांनी एक मोठं विधान केले केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा मोठा दावा खैरे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे त्यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. छगन भुजबळ, नारायण राणे पडले होते. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं चंद्रकांत खैरे यावेळी सांगायला विसरले नाही.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here