ताज्या बातम्यासोलापूर

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सोलापुर : शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील बार्शीमध्ये दिलं आहे.
एका कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आज बार्शीला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आपल्या सरकारच्या काळात दिवसा 12 तास वीज द्यायची आहे. त्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना आहे, त्यासोबत मुख्यमंत्री सौर फिडर योजनाही आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वीज निर्मिती कऱण्यात येणार आहे. मुक्यमंत्री सौर फिडर योजना 2018 मध्ये सुरु झाली होती. पण नंतर ती बंद करण्यात आली होती. आता ती शेतकऱ्यांसाठी पुन्हा सुरु कऱण्यात येणार आहे. आपले सगळे सोलर फिडरवर न्यायचे असा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसा बारा तास वीज प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत चार हजर मेगा वॅट वीज उपलध करण्याचा हेतू आहे. यासाठी शेतकऱ्यांची जागा भाड्याने घेणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. सौर फिडर लावण्यासाठी सर्वात महत्त्वाची अडचण ही जागेची होती. त्यावर उपाय म्हणून आम्ही आता शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घ्यायचा विचार केला आहे. यासाठी प्रत्येक हेक्टरी 75 हजार रुपये प्रति महिना प्रमाणे शेतकऱ्यांना शासनातर्फे भाडे दिलं जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आपलं सरकार आल्यानंतर तीन महिने झालेत मात्र या काळात 60 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले आहेत. एनडीआरएफनुसार दिली जाणारी मदत आम्ही दुप्पट केली. तसेच 65 मिलिमिटर पावसाची अट होती, मात्र अलीकडं सलग पाऊस येतंय जे 65 मिमी पेक्षा कमी असतो. मात्र यामुळे उभ्या पिकांचे मोठं नुकसान होते. त्यामुळे 65 मिमी पाऊस नसेल पण सलग पाऊस असेल तरी मदत दिली आहे. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी आणखी योजना करायच्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या योजनेसाठी 350 कोटी रुपयांची निविदा काढणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *