तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जबरी घरफोडी

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भिगवण :  डिकसळ गावाच्या हद्दीत माळीवस्ती येथे मंगळवारी (दि. १) पहाटे अज्ञात तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जबरी घरफोडी करीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटला आहे.
चोरीच्या या घटनेमुळे भिगवणसह लहान गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. १) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डिकसळ गावातील माळी वस्ती येथे राहणारे राहुल लहू भोंग (वय २८) यांच्या घराच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी जाळीचे शटर कशाने तरी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्या-चांदीचे सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून पोबारा केला.

अज्ञात चोरटे हे २५ ते ३० वयोगटाचे असून, अंगाने सडपातळ, उंची पाच फूट, अंगात काळ्या रंगाचे जर्किंग, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असा परिधान त्यांनी केलेला होता. चोरलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे गंठण, अंगठ्या, डोरले, मंगळसूत्र आदी वस्तूंचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. चोरीच्या तपासासाठी पथके तैनात करण्यात आली असून, तांत्रिक विश्लेषणचा आधार घेण्यात येत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील करीत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here