बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील शिक्षकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

ताज्या बातम्या वाचा व जगाशी रहा कनेक्टेड त्यासाठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा.https://chat.whatsapp.com/K7qwAEPs0s7LfJmVAQIP2I

मुकेश धनराज पाटील (वय-५६ रा. खेडे खुर्द ता, चाळीसगाव ह.मु. शिवाजीनगर पुणे) हे शिक्षक म्हणून नोकरीला आहे. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते २७ ऑक्टोबर रात्री ८ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याची समोर आले आहे. तसेच प्रॉपर्टीचे कागदपत्र, इन्शुरन्सचे कागदपत्र, बँक पासबुक, एटीएम कार्ड देखील चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर मुकेश पाटील यांनी तातडीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.

नवगण डोअर बीड वर टच करा व पहा सुंदर डोअर डिझाईन,आपल्या सुंदर घराला शोभा येईल सुंदर दरवाज्या मुळे लॅमीनेशन डोअर , फायबर डोअर सन्माईका डोअर ,सागवान डोअर , आर्कशक रंगसंगती , सुंदर डीझाईन ,100% वॉटरप्रूफ तर मग आजच भेटा व आपली बुकींग करा ….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here