रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार तिचा जागीच मृत्यू

आरोपी मिलिंद त्याची पत्नी प्रतिक्षावर नेहमी संशय घेत होता. आज प्रतिक्षा मोबाईल फोनवर बोलत असताना त्याचवेळी तिचा पती मिलिंद घरी पोहोचला. त्यानंतर त्याला संशय आल्याने त्याने रागाच्या भरात प्रतिक्षाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले

जालना : परतुर शहरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पत्नी मोबाईलवर बोलते याचा संशय घेऊन पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केली. ही घटना परतुर शहरातील सावता नगर भागात घडली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती रक्ताने माखलेल्या अवस्थेत परतुर पोलीस (Police) ठाण्यात हजर झाला. मिलिंद नारायण पाडेवार असं आरोपीचं नाव आहे. आरोपी पाडेवार याच्या कबुली जबाबानंतर परतुर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय.
प्रतिक्षा गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच परतुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रतिक्षाचा मृतदेह परतुर ग्रामिण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here