22.1 C
New York
Wednesday, May 1, 2024

Buy now

गावकऱ्यांनी एका रात्रीतून सोडलं गाव.. आणि आज हेच गाव आहे जागतिक पर्यटनस्थळ.. कुठे आहे ते?

- Advertisement -

गावकऱ्यांनी एका रात्रीतून सोडलं गाव.. आणि आज हेच गाव आहे जागतिक पर्यटनस्थळ.. कुठे आहे ते?

पर्यटन स्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वसंरक्षण, आत्मसन्मान याचे रक्षणार्थ राजस्थानातील कुलधरासह ८४ गावातील हजारो गावकर्‍यांनी एका रात्रीत गाव रिकामं केलं. शेतात काम करणार्‍यांनी आपलं शेत सोडलं. व्यापार्‍यांनी जम बसलेला व्यवसाय सोडला. आयुष्यभर कमाई करुन जमवलेली संपत्ती, जमीनजुमला सर्व सोडून एका रात्रीत गाव रिकामं केलं पण दुर्देव म्हणजे आज कितीतरी भारतीयांना याबाबत साधी माहितीही नाही. अशा या दिलदार नागरिकांच्या ऐकीचा अद्वितीय दाखला असलेल्या कुलधरा गावाबाबत आपण आज जाणून घेऊया..आणि होय आज हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले असून येथे देशविदेशातील हजारो पर्यटक येथे भेट देतात.

- Advertisement -

कुलधरा हे राजस्थानातील पालीवाल ब्राम्हणांनी वसवलेलं जैसलमेर जवळील एक छोटंसं गाव आहे. हे लोक मुलत: कष्टाळू व हुषार होते. त्यांनी प्रचंड मेहनतीने या वालुकामय प्रदेशातही त्याकाळीही सिंचनाच्या विशिष्ट पद्धतीने अक्षरशः नंदनवन फुलवले. तसेच जोडीला व्यापारही वाढवला. कारण येथून थेट दक्षिण आफ्रिका, इराण, इराक, रावळपिंडी, पेशावर अगदी महाराष्ट्रापर्यंत मालाची वाहतूक करणारा प्रमुख मार्ग होता. त्यामुळे त्याकाळी कुलधरा गाव व एकूणच हा ८४ गावांचा परिसर विकसित झाला, सुजलम-सुफलम झाला.

- Advertisement -

साधारण २०० वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्यावेळी कुलधरा गावचा दिवाण सालीम सिंह हा या संपुर्ण परिसराचा महसूल गोळा करीत असे. सालीम सिंह अंत्यत क्रूर व अत्याचारी म्हणून प्रसिद्ध होता. एकदा तो कुलधरा गावी आलेला असताना त्याची नजर गावातील पुजार्‍याच्या सुंदर मुलीवर पडली व त्याने गावात आदेश सोडला की, त्या मुलीला पुढील पौर्णिमेच्या आत माझ्याकडे पाठवा. हा आदेश येताच या संपूर्ण परिसरावरच धर्मसंकट आलं. कारण याचा अर्थ असा की, आता या परिसरातील कुणीही मुलगी अथवा महिला सुरक्षित नाही. लगेच गावाची पंचायत बसली व एकमुखी निर्णय झाला की, जे हाती असेल ते घ्यायचं व आजच रात्री सगळ्यांनी गाव सोडायचं. कारण उशीर केला असता तर बातमी पसरुन क्रूर सालीम सिंहाने परिसराची राख रांगोळी केली असती. म्हणून पटापट सगळीकडे गुप्त निरोप गेले व त्याच रात्री कुलधरासह ८४ गावातील लोकांनी आपल्या कष्टाने उभं केलेलं सर्व संपत्ती, ऐश्वर्य, घरातील जेष्ठ माणसं हे सगळं सोडून रात्रीतून गाव रिकामं केलं.

सालीम सिंहाच्या माणसांनी जेव्हा या ठिकाणी भेट दिली तेव्हा त्यांना पुर्ण ओस पडलेलं गाव दिसलं. मग त्यांनी संपुर्ण गाव उद्ध्वस्त केलं. त्याचे पडके अवशेष आजही पहायला मिळतात. मात्र कुलधरावासियांनी हे सर्व मनापासून त्यागलं नव्हतं. म्हणून जातांना त्यांनी शाप दिला की, या भागात परत कुणीही राहू शकणार नाही. त्यांचा हा तळतळाट आजही तिथे रात्री कुणी राहण्याचा प्रयत्न केला तर जाणवतो, असे म्हणतात.

तिथे रात्री माणसांची कुजबुज, स्रियांची लगबग, कुणाचा तरी चालण्याचा आवाज, घुंगरांचा व पावलांचा आवाज ऐकायला येतो असे म्हणतात. याबाबत जगभरातील अनेक तज्ज्ञांनी अत्याधुनिक तंत्राच्या साह्याने याबाबत शहानिशा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही हे सर्व जाणवलं. पण त्यांच्या कॅमेर्‍यात अथवा मशिन्समध्ये काहीही रेकाॅर्ड करता आलं नाही. तसेच येथे सायंकाळी ६ नंतर दिवस उजाडेपर्यंत कुणीही राहू शकत नाही. त्या रात्री गाव सोडलेले लोक कुठे गेले कुणालाच कळले नाही इतकी गुप्तता पाळली गेली. कालांतराने ही सर्व मंडळी गुजरात व राजस्थानच्या विविध गावात स्थायिक झाली.

असा हा सुजलाम-सुफलाम परिसर रात्रीतून भयप्रद अशा पडक्या गावांमध्ये परावर्तीत झाला. अगदी अलिकडेच राजस्थान पर्यटन विभागाने येथे काही सुधारणा केल्या. रस्ते केले. पडकी घरं थोडीफार सावरली आणि या राजस्थानी ब्राम्हणांच्या आत्मसन्मानाची गाथा जगाला कळावी या उद्देशाने कुलधरा परिसराचे पर्यटन स्थळात रुपांतर केले. राजस्थानात जैसलमेर येथे जाणार्‍या प्रत्येक पर्यटकाने येथे भेट द्यायलाच हवी. कारण आज अफगाणिस्तानात जे लोक रात्रीतून आपले सर्वस्व सोडून देश त्याग करत असतांना कुलधराचा त्या गावकर्‍यांचा शाप सालीम सिंहाच्या वंशजापर्यंत पोहचला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेवटी जे पेरले तेच उगवते.

कसे पोहचाल
कुलधरापासून केवळ १८ किलोमीटरवर जैसलमेर हे मोठे शहर आहे. जैसलमेर येथे जाण्यासाठी काही मोजक्या फ्लाईटस व रेल्वे स्थानक आहे.
केव्हा जावे
हा संपूर्ण परिसर रेतीमय असल्याने हिवाळा ऋतू म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी पर्यटनासाठी योग्य असतो.

कुठे रहाल
कुलधरा येथे राहण्याची परवानगी नाही. तशा सोयीही नाहीत. पण जैसलमेर शहरात सर्व दर्जाची हाॅटेल्स उपलब्ध आहे. तसेच येथून २५/३० किलोमीटर परिसर सॅंड ड्यून्स म्हणून ओळखला जातो. येथे अलिशान तंबूत राहण्याची व राजस्थानी कल्चर अनुभवण्याची छान संधी मिळते.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.

तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लोकशाही न्युजला फॉलो करा

 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles