अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत असतानाच तो चक्क उठून बसला

भर दिवाळीत (Diwali) अकोल्यातल्या (Akola) एका घरावर संकट कोसळलं. घरातल्या तरण्या ताठ्या मुलाचा मृत्यू झाला.

काळजावर दगड ठेवून नातेवाईकांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. जाणकार मंडळींनी तिरडी बांधली. त्याचा देह तिरडीवर चढवला. आता उचलून स्मशानात (Funeral) नेत होते, तोच जे घडलं, त्यानंतर गावातले लोक चळाचळा कापायला लागले.

मृत झालेल्या या तरुणाचे अचानक हात-पाय हालू लागले. खांद्यावर असलेली तिरडी हलू लागल्याने नातेवाईक घाबरले. त्यांनी एका मंदिरात तिरडी उतरवायचं ठरवलं… थोडी हालचाल करून तो तरुण थेट तिरडीवरून उठूनच बसला. मृत तरुण असा एकाएकी उठून बसल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

हा प्रकार घडला बुधवारी. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात. तरुणाचं नाव आहे प्रशांत मेशरे.

प्रशांत मेशरे हा होमगार्डमध्ये कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

नस चोक अप झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. 25 वर्षांच्या प्रशांतच्या मृत्यूचा धक्का पचवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तिरडी अचानक हलू लागली. त्यामुळे नातेवाईकांनी मंदिरात मृतदेह आणला. तेवढ्यात प्रशांत उठूनच बसला.

अचानक तो तिरडीवरून उठून बसल्याने अख्खा गाव हे पाहण्यासाठी आलं. मंदिर परिसरात एवढी गर्दी झाली की जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही बोलवावं लागलं.

प्रशांतच्या अंगात देव असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्याच्या दैवी शक्ती संचारल्याचंही बोललं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here