5.3 C
New York
Friday, March 29, 2024

Buy now

बीडच्या मांजरा धरण भरले, धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले

- Advertisement -

बीड : परतीच्‍या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजविला आहे. यात बीड जिल्‍ह्यात देखील मुसळधार पाऊ झाला आहे.
यामुळे बीडच्या मांजरा धरण (Manjara Dam) भरले आहे. या कारणाने धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले असून यातून 8736.68 क्यूसेस प्रतिसेकंद वेगाने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे (Beed) बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरले आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. धरणाचे 1, 3, 4, 6 हे दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. तर 2, 5 हे दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. दरम्यान या दरवाज्यावाटे 8736.68 क्यूसेस प्रतिसेकंद वेगाने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- Advertisement -

सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

दरम्यान पाण्याची आवक पाहून धरणातील विसर्ग कमी अथवा वाढू शकतो. यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना व कालव्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles