काश्मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काश्मिरी पंडितांवर आणि देशाच्या इतर भागातून रोजगाराच्या शोधात काश्मीर खोऱ्यात पोहोचलेल्या लोकांवर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत, ज्यामध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पुरण कृष्ण भट नावाच्या व्यक्तीला गोळ्या घातल्या. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here