तरुणीचा विनयभंग करुन फरफटत नेणाऱ्या ठाणे येथील ऑटोरिक्षा चालकाला अटक

तरुणीचा विनयभंग करुन तिला फरफटत नेणाऱ्या ठाणे येथील ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. कातिकादला उर्फ राजू अब्बाय असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
ठाणे पोलिसांनी (Thane Polic) त्याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. तरुणीचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. परंतू, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ठाणे रेल्वे स्टेश Thane Railway Station) परिसरात आरोपीने तरुणीचा विनयभंग केला होता. आरोपीने तरुणीचा केवळ विनयभंगच केला नाही तर तिला रिक्षासोबत फरफटतही नेले. उपस्थितांनी ही घटना पाहिली. परंतू, तरुणीची मदत करुन ऑटोचालकाला पकडेपर्यंत त्याने रिक्षासह पोबारा केला होता. मात्र, घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांना त्याचा धागादोरा लागला.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ठाणे पोलिसांनी आरोपी (ऑटोचालक) कातिकादला उर्फ राजू अब्बाय याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. पोलिसांनी आरोपीला नवी मुंबई परिसरातील दिघा येथून ताब्यात घेतले. त्याची रिक्षाही जप्त करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here