या रुग्णालयात 500 बेवारस मृतदेह,अवयव काढण्यात आल्याने खळबळ

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कराची : पाकिस्तानातील पंजाब निश्तार रुग्णालयामधून मोठी बातमी समोर आली आहे.
रुग्णालयात 500 बेवारस मृतदेह सापडले आहेत. सर्व मृतदेहांचे विविध अवयव काढण्यात आल्याचे देखील आढळून आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे संपूर्ण प्रातांत खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत पाकिस्तानी प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
निश्तार मेडिकल युनिव्हर्सिटीच्या निश्तार हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये उघड्यावर मृतदेह दिसत होते. मृतदेहांना वरच्या मजल्यावर आणि जुन्या लाकडी खाटांवर टाकण्यात आले होते. निश्तार हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “मुलतानच्या निश्तार हॉस्पिटलच्या टेरेसवर मृतदेह कुजण्याची एक भयानक घटना समोर आली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतदेह चुकीच्या पद्धतीने हाताळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. पाकिस्तानी मीडियानुसार, दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागाने निश्तार हॉस्पिटलच्या मृतदेहांच्या अवहेलनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची टीम तयार केली आहे.
प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व मृतदेहांची विटंबना करण्यात आली असून त्यांचे मानवी अवयव काढण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास अहवाल तयार करण्यास सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here