9.1 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

श्रमदानातून स्वच्छतेचा वसा जपणे सर्वांची जबाबदारी व वृक्षसंवर्धन काळाची गरज-मुख्यधिकारी सुंदर बोंदर

- Advertisement -

शांतीवन समशानभूमी परिसरात न.प.च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता व वृक्षारोपण

- Advertisement -

श्रमदानातून स्वच्छतेचा वसा जपणे सर्वांची जबाबदारी व वृक्षसंवर्धन काळाची गरज-मुख्यधिकारी सुंदर बोंदर

- Advertisement -

परळी वैजनाथ : शहरातील भीमनगर येथील शांतीवन समशानभूमी परिसरात परळी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत स्वच्छता केली.यावेळी कर्मचार्यांनी वृक्षारोपणही केले. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा पुढे नेण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. तसेच सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छता राखावी तसेच वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन न.प.चे मुख्यधिकारी सुंदर बोंदर यांनी केले.
शहरातील भीमनगर येथील शांतीवन समशानभूमी परिसरात नगर परिषदेच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवस श्रमदानातून स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम राबविण्यात यावी असं आव्हान न.प.चे मुख्यधिकारी सुंदर बोंदर यांनी केले होते.त्या अनुषंगाने भीमनगर भागातील बौद्ध समाजाची एकमेव 3 एकर परिसरातील समशानभूमी या ठिकाणी शुक्रवार दि. 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते 11 दरम्यान नगर परिषदेच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता व वृक्षारोपण केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे गवत व परिसरातील भाग नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रमदानातून स्वच्छते बरोबरच या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. श्रमदानातून हातात झाडू, खराटे, खोरे घेऊन संत गाडगेबाबांचा एक मंत्र स्वच्छतेचे जाणा तंत्र हा नारा देत मुख्यधिकारी सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक संतोष रोडे, सुहास मिसाळ, शंकर साळवे, एस. व्ही. घाटे, विकास जगतकर, राजाभाऊ जगतकर, विलास केदारे, कपिल जगतकर, सुशील जगतकर, शरणम ताटे, संघानंद कांबळे, राज गायकवाड, व्ही. बि. डुबे, शैलेंद्र शहाणे, अनिल गोदाम यासह परळी वैजनाथ नगर परिषदेतील सर्व विभागातील कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषद मुख्यधिकारी सुंदर बोंदर म्हणाले की, आपला परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य ही उत्तम राहते. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वानी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता व आरोग्याचा थेट संबंध येत असल्याने आपल्या परिसरातील सांडपाणी व घन कचऱ्याचे यथायोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरून स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची देखील जपणूक होण्यास मदत होईल, भारतीय संस्कृतीत स्वच्छतेला अधिक महत्व असून आपण विविध सणांची सुरुवात परिसर व घराच्या स्वच्छतेतून करीत असतो. स्वच्छते सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करण्यासोबतच त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles