स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष उलटुनही ओढ्यातुन शाळेसाठी प्रवास


स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष उलटुनही एसटी न पाहिलेलं फुकेवाडेकर शिक्षण हक्कासाठी आक्रमक; ओढ्यातुन शाळेत जायचं का???:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
बीड तालुक्यातील बीड शहरापासुन केवळ २२ किलोमीटर अंतरावरील बालाघाटाच्या डोंगरद-यातील मौजे. पिंपरनई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत फुकेवाडी गाव अंदाजे लोकसंख्या २७० सध्या शाळेची पटसंख्या १६ आहे त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या समायोजन यादीत शाळेचे नाव आल्यामुळे शाळा बंद होण्याच्या भितीने पालक चिंताग्रस्त झाले असून ग्रामस्थ मुलांच्या शिक्षण हक्कासाठी एकवटले असुन पटसंख्या कमी दाखवून ऊसतोड मजूर शेतकरी,कष्टकरी यांच्या लेकरांचे शिक्षण बंद करायचा सरकारचा विचार आहे काय?असा संतप्त सवाल त्यांनी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना केला.

कचचुंडीला ४ किलोमीटर आणि लिंबागणेशला ३ किलोमीटर ओढ्यातुन डोंगरद-यातुन लेकरं शाळेत पाठवायची कशी??:- शारदा मानकर पालक फुकेवाडी
___
फुकेवाडी येथील मुलांची शाळा बंद केली तर ४ किलोमीटर करचुंडी आणि ३ किलोमीटर लिंबागणेश याठीकाणी शाळेची सोय असुन ओढे नाले डोंगरद-यातुन वाट काढत लेकरांनी कसं शाळेत जायचं? आम्हाला शिक्षण बंद केल्याशिवाय दुसरा ईलाजच नाही.

७५ वर्षे उलटुन सुदधा गावाने अजुन एसटी पाहिली नाही आता शाळा बंद म्हणल्यावर अवघडंय:- बाजीराव पवार;वयोवृद्ध ग्रामस्थ फुकेवाडी
____
स्वातंत्र्य उलटुन ७५ वर्षे उलटली माझं वय ७५ वर्ष अजुन गावानं एसटी पाहिली नाही,आता कमी लेकरं असल्यामुळे जर शाळाच बंद करत असतिल तर गोरगरीबांच्या लेकराचं मग अवघडंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

शासनाने भौगोलिक परिस्थिती व वास्तवतेची जाणीव ठेवून एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी:-डाॅ.गणेश ढवळे
__
राज्य शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळाचे समायोजन करताना भौगोलिक परिस्थीती तसेच रस्त्याची सोयीसुविधा आदिंचा विचार करून निर्णय घ्यावा तसेच शिक्षण हक्क आधिकार कायद्याची पायमल्ली होऊ न देता एकही मुलगा गैरसोयीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here