कडीनदी वरील बंधाऱ्याचे दरवाजे लावण्याआधी बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी- सय्यद रहेमान


 

कडीनदी वरील बंधाऱ्याचे दरवाजे लावण्याआधी बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी- सय्यद रहेमान

दरवाज्यातून होणारी पाणी गळती थांबवावी

कडा : येथिल हनुमान मंदिर,शनी मंदिर जवळ कोल्हापूरी पद्धतीने बनवलेल्या बंधाऱ्याच्या दरवाज्यातून होणारी पाणी गळती थांबवावी. बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार आष्टी,जलसंधारण उपविभाग आष्टी यांना शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सय्यद रहेमान यांनी दिले.असून निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, प्लास्टिक कागद (ताडपत्री) टाकुन काही उपयोग होत नाही हे मागच्या दोन वर्षांपासून बघतोय.पाणी गळती होण्याचे मुख्य कारण म्हणजे नुसतेच दरवाजे बंद करायचे म्हणून बंद करायचे ते दरवाजे मग कसेपणे बसू दरवाजे कसे बसले दरवाज्यातून पाणी गळती होत आहे हे पण बघायला पाहिजे ना दरवाज्याची दुरुस्ती केली गेली नाही.कधी ग्रीस,आँइलिंग,दरवाज्याच्या रबरी पट्टे हे सुध्दा कधी बघितले नाही. मागच्या वर्षी हि या बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती थांबवावी म्हणून जनतेची मागणी होती.तशी वृत्तपत्रात बातमी हि छापुन आली होती तरीही काहिच कारवाही झाली नाही.आपणांस पुन्हा विनंती करतोत की यावर्षी यावेळी दरवाजे (बंद)लावण्या अगोदर बंधाऱ्याच्या दरवाज्यातून होणारी पाणी गळती १००% पुर्णपणे बंद होईल याची काळजी घेऊन संपूर्ण दरवाज्यांची दुरुस्ती करून द्यावी या मागणीचे निवेदन विभागीय जलसंधारण अधिकारी आष्टी व तहसिलदार आष्टी यांना शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सय्यद रहेमान यांनी दिले आहे.

बंधाऱ्याचे दरवाजे लावूनही पाणी गळती होते तर दरवाजे लावून ही काय उपयोग.पाणी गळती थांबवावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करून पाणी गळती होणार नाही याची दखल घ्यावी व वाया जाणारे पाणी वाचवावे.
रविंद्र ढोबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here