9.1 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

‘भगिरथ असं जायला नको होतंस,’ -भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाचे बीड शहराध्यक्ष भगिरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
कट्टर समर्थकाच्या निधनामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘भगिरथ असं जायला नको होतंस,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Pankaja Munde’s reaction on Beed BJP city president’s suicide)

- Advertisement -

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीड भाजपचे शहराध्यक्ष आणि माझा अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता भगिरथ बियानी यांच्या निधनाची बातमी अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. भगिरथ असं जायला नको होतंस…
भाजपचे बीड शहराध्यक्ष बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गोळीबारीचा आवाज ऐकून घरातील आणि शेजारील लोक धावत घरात आले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. याबाबतची माहिती मिळताच भाजपचे कार्यकर्ते आणि बियाणी यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र, बियाणी यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप पुढे येऊ शकली नाही.

- Advertisement -

घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळी झाडून घेतल्यानंतर बियाणी यांचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळताच बीडमध्ये उपस्थित असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तसेच, कार्यकर्त्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही बियाणी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी घराची पाहणी केली आहे. मात्र बियाणी यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. बियाणी यांच्या आत्महत्येने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles