क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हामाजलगाव

बीड झोपेत असताना पतीने पत्नी आणि पोटाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्य


बीड : बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये साखर झोपेत असताना पतीने पत्नी आणि पोटाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावात ही घटना घडली आहे. पांडुरंग दोडतले असं हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांना फोन करून हत्या केल्याची माहिती दिली. माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर पांडुरंग दोडतले कुटुंबासह राहतो.

आज पहाटे साखर झोपेत असणाऱ्या पत्नी लक्ष्मी आणि मुलगा पिल्या या दोघांची पांडुरंग याने तीक्ष्ण हत्याराने हत्या केली.

पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतलेने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले याला अटक केली.

या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हत्या का आणि कशामुळे केली, हे अद्याप समोर येऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *