9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

प्रवासाचा आनंद भारी…लहान मुलांची रेल्वे सवारी…!

- Advertisement -

प्रवासाचा आनंद भारी…लहान मुलांची रेल्वे सवारी…!
—————————————————
577 विद्यार्थांनी केला रेल्वेने प्रवास
————————————————

- Advertisement -

आष्टी : आष्टी-अहमदनगर (डेमू) रेल्वे सेवा मागील पंधरा दिवसापासून सुरू झाली.याच रेल्वेतून विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाचा आनंद घेता यावा या अनुषंगाने दि.7 आॅक्टोंबर रोजी रयत शिक्षण संस्थेचे
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा,अहमदनगर
इ 1 ली ते 4 थी चे 315 विद्यार्थी व शाळेतील शिक्षक तसेच आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरवडे वस्ती,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणसेवाडी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेवाडी,या सर्व शाळेची पर्यटन क्षेत्र व शैक्षणिक सहल रेल्वेद्वारे सोलापूर वाडी पर्यंत प्रवास करून रेल्वेचा आनंद घेतला.
न्यू आष्टी-अहमदनगर ही प्रवासी (डेमू) रेल्वे नव्याने सुरू झाली असून,सुरूवातीचे आठ दिवस प्रवासी संख्या पाहता काहि लोकांनी आगडोंब उठविला अन् “पांढरा हत्ती पोसतोय अशा वैगेरे वैगेरे वृत्त सोशल मिडीयावर प्रकाशित केले.हे वृत्त साफ चुकीचे ठरले आहे.या मार्गावर प्रवाश्यांची जास्त गर्दी नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना रेल्वेची आनंददायी सफर घडवून आणण्याची हीच सुवर्णसंधी साधत आष्टी,जामखेड,नगर तालुक्यातील
शाळेंनी या रेल्वेचा आनंद घेतला.रयत शिक्षण संस्थेचे
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा,अहमदनगर आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरवडे वस्ती,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणसेवाडी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेवाडी,जामखेड तालुक्यातील आरणगांव येथील मळईवस्ती जिल्हा परिषद शाळा आशा एकूण आज सहा सात शाळेतील सुमारे 577 विद्यार्थ्यांनी न्यू आष्टी रेल्वे स्टेशन ते सोलापूरवाडी रेल्वे स्टेशन अशी थरारक आणि उत्साहवर्धक अशी अविस्मरणीय रेल्वे सफर घडवून आणली.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles