राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांचे खाजगी सचिव डॉ.विशाल राठोड यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांचे खाजगी सचिव डॉ.विशाल राठोड यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार

परळी वैजनाथ  : परळी तालुक्यातील भुमिपुत्र डॉ.विशाल राठोड यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड यांचे खाजगी सचिवपदी नुकतीच नियक्ती झाली आहे. त्याबद्दल परळी येथे शनिवार, दि.08 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

परळीचे भूमिपुत्र असलेले हिंगोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल राठोड यांची महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड यांचे खाजगी सचिव (पी.एस.) म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.डॉ.विशाल राठोड यांनी यापूर्वी प्रशासकिय सेवेत उत्कृष्ठ कार्य केले असुन सर्वसामान्य नागरीकांशी संपर्कात राहुन अनेक योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे.ना.संजय राठोड यांनी त्यांची खाजगी सचिव म्हणुन नियुक्ती केल्यानंतर त्यांचे वर्गमित्र असलेले व महाराष्ट्रात आपल्या सामाजीक कार्यामुळे ओळखले जात असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये डॉ. विशाल राठोड यांचा प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा,पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.यावेळी सरपंच हरीश नागरगोजे, कैलास तांदळे, पत्रकार धनंजय आढाव, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, महादेव शिदे, विकास वाघमारे, राजकुमार डाके व आदी उपस्थित होते. तसेच परळी शहरातील पत्रकार विकास वाघमारे यांचाही वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here