डंपर व जीप यांच्यात अपघात विद्यार्थ्यासह त्याचे आई- वडील गंभीर

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

अपघातात रागिनी नायकर (वय ४०), शिवकुमार नायकर (वय ४५) व मुलगा हर्षल नायकर (वय १५) सर्व रा. नंदुरबार हे तिघे जखमी झाले आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात खांडबारा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील श्रावणी येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या (Student) विद्यार्थ्यांला आई- वडील घरी घेऊन जात होती.
या दरम्‍यान निंबोणी गावाजवळ त्‍यांच्‍या वाहनाला झालेल्या अपघातात (Accident) विद्यार्थ्यासह त्याचे आई- वडील गंभीर जखमी झाले आहे.
विसरवाडी- नंदुरबार (Nandurbar) रस्त्यावर निंबोणीनजीक डंपर व जीप यांच्यात हा अपघात झाला. नवापूर (Navapur) तालुक्यातील निंबोणी गावानजीक वळणावर सोनगीरहून सुरतकडे जाणारा डंपर आणि श्रावणीहून नंदुरबारच्या दिशेने जाणारी जीप यांच्यात हा अपघात (Accident News) झाला. डंपरने धडक दिलेल्या भीषण अपघातात जीपची एक साईड पूर्णता दाबली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here