बीड भीषण अपघात,एक ठार,दोघे जखमी

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट विक्रेते पूजा डिस्ट्रिब्यूटर्सचे जितेंद्र झंवर हे पत्नी ज्योती, मुलगी ऋतुजा असे तिघे कार क्रमांक एम.एच. ४४ एस २९९० ने औरंगाबाद येथून रात्री अंबाजोगाई येथे येत होते.दरम्यान बीडच्या बाहेर निघताच पालीच्या जवळी कोळवाडी येथे एका टिप्परने कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चेंदामेंदा झाला.

बीड : अंबाजोगाई येथील झंवर कुटुंब पती, पत्नी व मुलगी हे कारने औरंगाबाद येथून अंबाजोगाई येथे परत येताना टिप्पर व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात पत्नी ठार तर मुलगी व पिता जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी जवळ आज शुक्रवारी ( दि. ३० ) पहाटे घडली आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे समजते.

अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट विक्रेते पूजा डिस्ट्रिब्यूटर्सचे जितेंद्र झंवर हे पत्नी ज्योती, मुलगी ऋतुजा असे तिघे कार क्रमांक एम.एच. ४४ एस २९९० ने औरंगाबाद येथून रात्री अंबाजोगाई येथे येत होते.दरम्यान बीडच्या बाहेर निघताच पालीच्या जवळी कोळवाडी येथे एका टिप्परने कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघात ज्योती जितेंद्र झंवर यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगी ऋतुजा जितेंद्र झंवर गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. जितेंद्र झंवर हे किरकोळ जखमी असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी अंबाजोगाई येथे ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर आणि हा अपघाताची बातमी समजताच अंबाजोगाई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here