पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा शेततळ्यात फेकून केला खून

जालना : पत्नी चारचौघात अपमानास्पद बोलली म्हणून संतापाच्या भरात पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा शेततळ्यात फेकून खून केल्याची घटना तालुक्यातील निधोना शिवारात बुधवारी घडली.जगन्नाथ डकले असे पित्याचे नाव आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर सोशल मिडियावरील अफवांचा आधार घेत मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव या पित्याने केला

पत्नीशी झालेल्या भांडणातून झोक्यात झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेऊन तिची शेततळ्यात फेकून देऊन हत्या केल्याची कबुली मुलीच्या वडीलांनी दिलीय. जगन्नाथ डकले असं आरोपी वडिलांचं नाव असून श्रावणी डकले असं हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचं नाव आहे.

आई वडिलांच्या भांडणातूनच या मुलीची हत्या झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय. पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतलं असून रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

पती पत्नीची भांडणं काही नवीन नाहीत, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे प्रत्येक नवरा-बायकोमध्ये भांडण चालू असतं. मात्र दोघांच्या भांडणामध्ये अनेकवेळा मुलांवर राग निघतो नाहीतर आत्महत्या केल्याची अनेक प्रकरण पाहिली असतील.
अशातच जालनामध्ये एका बापाने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत जे केलं त्याने खळबळ उडाली आहे.
जालनामध्ये निधोना शिवारामध्ये एका दीड वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तपास केल्यावर जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. ज्या लहान मुलीचं अपहरण झालं होतं तिला तिच्याच वडिलांनी एका शेततळ्यात फेकलं होतं.

आरोपी बापाने पत्नीशी झालेल्या भांडणातून झोक्यात झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेऊन तिची शेततळ्यात फेकून देऊन हत्या केली होती. त्यानंतर अपहरणाचा बनाव रचला मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर सत्य समोर आलं. जगन्नाथ डकले असं आरोपी वडिलांचं नाव असून श्रावणी डकले असं हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचं नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here