दारू पिण्याच्या बहाण्याने तरुणाचा खून,मृतदेह ओढ्यात फेकला

गणेश गायकवाड याला त्याचा मित्र मोहम्मद आणि त्याच्या सोबत असलेला गिरीश या दोघांनी दारू पिण्याच्या बहाण्याने चऱ्होली बुद्रुक येथे नेले. तिथे गणेशच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. यात गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी गणेशचा मृतदेह ओढ्यात फेकला.

पिंपरी : दारू पिण्याच्या बहाण्याने तरुणाला घेऊन जाऊन त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह ओढ्यात फेकून पुरावा नष्ट केला. ही घटना शनिवारी (दि. २४) चऱ्होली बुद्रुक येथे उघडकीस आली.
पोलिसांनी दोघांना अटक केली.

गणेश लक्ष्मण गायकवाड (वय ३४, रा. हडपसर, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेशचा चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी, कात्रज. मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोहम्मद जहीर सुनशरीफ शेख उर्फ सलीम (वय ३४, रा. लोहगाव, पुणे), गिरीश गुलाब गायकवाड (वय ४४, रा. लोहगाव, पुणे) यांना पोलिसांनीअटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड याला त्याचा मित्र मोहम्मद आणि त्याच्या सोबत असलेला गिरीश या दोघांनी दारू पिण्याच्या बहाण्याने चऱ्होली बुद्रुक येथे नेले. तिथे गणेशच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. यात गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी गणेशचा मृतदेह ओढ्यात फेकला. तब्बल दोन आठवडे मृतदेह पाण्यात होता. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here