बीडचे आपत्तीव्यवस्थान ऊंटावरून शेळ्या राखणारे जिल्हाधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट

बीडचे आपत्तीव्यवस्थान ऊंटावरून शेळ्या राखणारे ,जिल्हाधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट आदेश काढले अंमलबजावणी कोण आणि कधी करणार :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
बीड  : बीड तालुक्यातील बिंदुसरा मध्यम प्रकल्प अंतर्गत नदी नाले,ओढे यांना पुर आल्याने पाली धरण पुर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावर पाणी वाहत आहे तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीमुळे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील भिंतीवरून पर्यटक चालत असतात,धरणाच्या भिंतीवर बसुन फोटोसेशन करत असतात,धरणात मासेमारी करताना तर काहीजण सांडव्याच्या डोहात पोहत असतात. गेल्यावर्षी याठिकाणी डोहात बुडुन दोन युवकांचा मृत्यु झाला होता. संबधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाप्रशासनाला रितसर लेखी तक्रार करून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

तहसिलदारांनी कागदावर आदेश काढले पण अंमलबजावणी कोण आणि कधी करणार???:-डाॅ.गणेश ढवळे
___
सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तहसिलदार बीड तथा आपत्तीव्यवस्थान प्राधिकरण बीड सुहास हजारे यांनी पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन बीड ग्रामिण,ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत पाली आणि उपअभियंता बीड पाटबंधारे उपविभाग बीड यांना बिंदुसरा धरण पाणलोट क्षेत्र अंतर्गत प्रतिबंध क्षेत्रात अपघात,दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच त्याठीकाणी कोणतीही जिवित व वित्तहानी होणार नाही याबाबत योग्य तो खबरदारीचा उपाय म्हणून २४ तास पोलीस कर्मचा-यांची नियुक्ति करून दर्शनी भागात सुचना फलक ठळक अक्षरात लाऊन ध्वनीक्षेपाद्वारे धोक्याची माहिती देण्यात यावी तसे या कार्यालयास अवगत करावे असे आदेश दिले आहेत परंतु कागदोपत्री आदेश दिले असले तरी अंमलबजावणी कधी होणार आणि कोण करणार हा खरा प्रश्न आहे कारण आजही त्याठिकाणी पर्यटक सांडव्याच्या डोहात पोहताना,भिंतीवर चढताना निदर्शनास येत आहेत.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

पाणलोट क्षेत्र अंतर्गत उपाययोजना करण्यात याव्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here