बीड गुन्हेगारांच्या मोटारसायकलची बैलगाडीला धडक गाडीने घेतला पेट…

गुन्हेगारांच्या मोटारसायकलने बैलगाडीला धडक देताच पेट घेतला,नेकनुर पोलीस घटनास्थळी दाखल:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
आज दिनांक.२४ सप्टेंबर वार शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गवर मौजे मुळकवाडी बसस्थानकासमोर मोटारसायकलने बैलगाडीला पाठीमागून धडक दिली त्यात बैलगाडी मोडून पडली व मोटारसायकलने पेट घेतला.
बैलगाडीतून प्रवास करणारे मौजे. मुळुकवाडी येथील अयोध्या रामदास ढास वय ५५ वर्षे या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांना बीड येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे तसेच मच्छिंद्र सूर्यभान ढास वय ५५ वर्षे आणि शारदा मच्छिंद्र ढास वय ५० वर्षे किरकोळ जखमी झाले आहेत.

मोटारसायकल स्वार सराईत गुन्हेगार ;एकजण पळुन जाण्यात यशस्वी एकास नेकनुर पोलीसांनी पकडले
____
मोटारसायकल स्वार सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडे तलवार आणि कटर व पाना आदि घरफोडीचे साहित्य आढळुन आले असून नेकनुर पोलीस स्टेशन सपोनि शेख मुस्तफा यांनी घटनास्थळी भेट दिली असून मोटारसायकलवरील एकजण पळुन जाण्यात यशस्वी झाला तर एकास ग्रामस्थांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले .

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here