महाराष्ट्रामध्ये बाप पळवणारी टोळी – उद्धव ठाकरे

मुंबई | ‘दसरा मेळावा (Dussehra Melava) हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर आज (21 सप्टेंबर) पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांच्या मेळावा घेतला राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तोफ डागली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज हे ऐवढी गर्दी जमली आहे. तर दसऱ्याला किती गर्दी असेल. किती पटीत असेल, आणि दसरा मेळावा हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे. व्यासपीठावर आल्यावर मी एक-दोन गोष्टी बघितल्यात एक तर पहिली रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत एक खुलासा करून टाकतो, नाही तर उद्या चौकट यांची की, संजय राऊत मिंदे गटामध्ये गेले. नाही मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. पण संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. या निश्चयाने लढतायत, आणि या लढाईसोबत आहेत.

आज पर्यंत मी पोरं पळवणारी टोळी ऐकली होती. मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये बाप पळवणारी टोळी पाहत आहे. असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी एक मी खुर्ची मुद्दामून ठेवली आहे कारण की संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसाठी लढत आहेत. ते ‘मिंदे’ नाहीत. असे ठाकरे म्हणाले

याचबरोबर काही लोक माझा बाप चोरायला निघाले आहेत. आजपर्यंत पोरं चोरणारी टोळी ऐकली होती पण पहिल्यांदा मी आज बाप चोरणारे पाहतोय. असे उद्धव ठाकरे म्हणाले. याच बरोबर ज्यांना मी सत्तेचं दूध पाजलं तेच आज उलट्या करायला लागले आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here