त्याने महिलेशी संपर्क साधत खोटे बोलून घरी बोलावले आणि मग….

नाशिक : विवाहीतेवर सहका-याने बलात्कार केल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणी संशयित सुजीत कातकाडे (रा.सयाजी पॅलेस) याला पोलिसांनी गजाआड केले आहे. पीडित विवाहीता आणि संशयित एकाच आस्थापनात काम करतात त्यामुळे ते एकमेकांचे परिचीत आहेत. गेल्या २१ मे रोजी संशयित आपल्या घरी एकटा असतांना त्याने महिलेशी संपर्क साधत खोटे बोलून घरी बोलावले. दुपारच्या वेळी पीडिता त्याच्या घरी गेली असता त्याने बळजबरीने बलात्कार केला. यानंतर महिला गेल्या बुधवारी आडगाव मेडिकल कॉलेज कडून आपल्या घराकडे जात असतांना संशयिताने वाहन अडवित तिचा विनयभंग केला. संशयिताचा त्रास वाढल्याने विवाहीतेने पोलिसात धाव घेतली असून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here