अल्पवयीन मुलीचे अपहरण, झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार

मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे वडाळा येथून अपहरण करुन तिच्यावर पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

मुंबई: अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnap) करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.
मुंबईतील वडाळा पूर्व परिसरात ही मुलगी राहते. ५ सप्टेंबर ला पीडित मुलगी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. पीडित मुलगी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, वडाळा येथे पोहचली असताना आरोपी विशाल विरकर हा बोलेरो गाडी घेऊन तेथे आला होता. यावेळी त्याने मुलीला आपल्या गाडीत जबरदस्तीने बसवले. यानंतर तो पीडित मुलीला पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेला धमकावून आणि मारहाण करत तिच्यावर त्याने अत्याचार (Sexual Assault) केले असा आरोप पीडितेने केला आहे.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कंळबोली पोलिस ठाण्यात सुरवातीला गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा माटुंगा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. माटुंगा पोलिस ठाण्यात आरोपी विशाल विरकर विरोधात ३६३, ३६६(अ), ३७६, ३२३, ५०६ भा.द.वि कलमासह ४,८,६ पोस्को कायद्यांतर्गग गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here